Saturday, July 25, 2020

शिक्षण आणि बरंच काही....



शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद रत्नागिरी अपडेट

 

रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील इयत्ता 5 वी ते ७ वी मधील विद्यार्थ्यांची ISRO,भारत व NASA या अमेरिका अंतराळ संशोधन संस्थेस भेट घडवून आणणेसाठी नाविन्य पूर्ण योजनेचे परीक्षार्थी विद्यार्थी तालुका निहाय माहिती.

प्रति,

गटशिक्षणाधिकारी,

पंचायत समिती सर्व,

विषय - रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील इयत्ता 5 वी ते ७ वी मधील विद्यार्थ्यांची ISRO,भारत व NASA या अमेरिका अंतराळ संशोधन संस्थेस भेट या नाविन्य पूर्ण योजनेबाबत.

उपोरोक्त संदर्भान्वये रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील इयत्ता 5 वी ते ७ वी मधील विद्यार्थ्यांची ISRO,भारत व NASA या अमेरिका अंतराळ संशोधन संस्थेस भेट यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील इयत्ता ५ वी ते ७ वी ची वर्गनिहाय पट संख्या सोबत दिलेल्या pdf मधील माहिती EXCEL SHEET मध्ये भरून स्वाक्षरी सह १ प्रत कार्यालयात  ११-०८०२०२३ पर्यंत सदर करावी.

       DOWNLOAD PDF 





               शिक्षण म्हणजे..


           

शिक्षण म्हणजे समजून घेणे, शिक्षण म्हणजे स्वत: विचार करणे, शिक्षण म्हणजे समाजासाठी जीव तुटणे, शिक्षण म्हणजे चांगलं माणूस होणं, शिक्षण म्हणजे नवीन कला आत्मसात करणे, शिक्षण म्हणजे युवापिढी घडवणे.



शिक्षण:-

(१) गुरुवर्यांनी आपल्या ज्ञानाची व अनुभवाची छाप विद्यार्थ्यांवर पाडणे म्हणजे शिक्षण.  
(२) अपक्व मनाचा परिपक्व मनाशी निकट संबंध येणे म्हणजे शिक्षण. 
(३) व्यवहारातील कामाचे वळण मुलांना लावणे म्हणजे शिक्षण. 
(४) शिक्षण म्हणजे आत्मशिक्षण होय.



 सावित्रीबाई फुले :- 
ह्या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा ३ जुलै १८४८ साली  सुरू केली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. त्यांनी स्त्री व शूद्रांमधे शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. त्यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा
संप घडवून आणला.


महात्मा ज्योतिराव फुले :-
ज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि, अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या साली मिळाली.


 आपल्या सर्वाना लक्ष्यात ठेवले पाहिजे कि, शिक्षण हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. ज्यामुळे आपल्याला समाजात आदर मिळतो आणि त्यामुळे आपण समाजात आपली मान उंचावून जगू शकतो.