Irregular Verbs

 Irregular Verbs अनियमित क्रियापदे 

  • क्रियापदे दोन प्रकारची असू शकतात- नियमित किंवा अनियमित.
  • नियमित क्रियापदांना (Regular Verb) -ed हा प्रत्यय लावून त्याचे भूतकाळ (Past Tense) आणि भूतकाळ वाचक धातुसाधित (Past participle) रूप बनवितात.
  • अनियमित क्रियापदांना (irregular verbs) -ed हा प्रत्यय न लावता वेगळ्या पद्धतीने भूतकाळ आणि भूतकाळ वाचक धातुसाधित (Past participle) रूप बनवितात.
  • अनियमित क्रियापदांचे तीन प्रकार आहेत.

1. अशी क्रियापदे ज्यांची तिन्ही रुपे एक सारखी आहेत.

जसे- (cut, cut, cut)

2. अशी क्रियापदे ज्यांची तीनपैकी दोन रुपे सारखी आहेत.

जसे- (sit – sat – sat)

3. अशी क्रियापदे ज्यांची तिन्ही रुपे भिन्न आहेत.

जसे- (Ring – rang – rung)

आपण पाहूया अनियमित क्रियापदे कोणती आहेत -

ADVERTISEMENT -

DEAL INDIA Accessories Professional Salon Hair Comb set pack of 10 Different Pieces comb Set

M.R.P.:₹999.00

Price:

₹199.00 

  Irregular Verbs अनियमित क्रियापदे 
Infinitive, Present TensePast TensPast Participle
(मूळ क्रियापद, वर्तमानकाळ)भूतकाळ(भूतकाळ धातुसाधित)
awake - जागे होणे / करणे.awoke - जागा झाला / केला.awoken - जागा झालेला / केलेला.
be - असणेwas, were - होता, होती, होते.been- असलेला.
bear - वाहून नेणे.bore- वाहून नेला.borne- वाहून नेलेला.
beat- मारणे.beat - मारला.beaten- मारला.
become - होणे.became - झाला.become - झालेला.
begin - सुरू करणे / होणे.began - सुरु केला / झाला.begun - सुरु केलेला / झालेला.
bend - वाकणे, वाकवणे.bent - वाकला, वाकवला.bent - वाकलेला, वाकवलेला
bind - बांधणे.bound- बांधला.bound - बांधला.
bite - चावणे.bit - चावलाbitten - चावलेला
blow - वाहणे, फुंकणे.blew - वाहला, फुंकला.blown - वाहलेला, फुंकलेला.
break - मोडणे, तुटणे.broke - मोडला, तुटला.broken - मोडलेला, तुटलेला.
bring - आणणे.brought - आणला.brought - आणलेला.
build - बांधणे.built - बांधला.built - बांधलेला.
burn - जळणे, जाळणे.burnt - जळला, जाळला.burnt - जळालेला, जाळलेला.
burst - फुटणे.burst - फुटला.burst - फुटलेला.
bury - जमिनीत पुरलेला.buried - जमिनीत पुरला.buried - जमिनीत पुरलेला.
buy - विकत घेणे.bought - विकत घेतला.bought - विकत घेतलेले.
carry - वाहून नेणे.carried - वाहून नेला.carried - वाहून नेलेला.
catch - पकडणे.caught - पकडला.caught - पकडलेले.
choose - निवडणे.chose - निवडला.chosen - निवडलेले.
come - येणे.came - आला.come - आलेले.
copy - नक्कल करणे.copied - नक्कल केली.copied - नक्कल केलेले.
cost - किंमत पडणे / असणे.cost - किंमत पडली / झाली.cost - किंमत पडलेले / असलेले.
creep - सरपटणे, रांगणे.crept - सरपटला, रांगला.crept - सरपटलेले, रांगलेले.
cry - रडणे, ओरडणे.cried - रडला, ओरडला.cried - रडलेला, ओरडलेला.
cut - कापणे.cut - कापला.cut - कापलेले.
dig - खणणे.dug - खणला.dug - खणलेले.
do - करणे.did - केला.done - केलेले.
draw - काढणे, ओढणे.drew - काढला, ओढला.drawn - काढलेला, ओढलेला.
drink - पिणे.drank - प्यायला.drunk - प्यायलेला.
drive - हाकणे, चालवणे.drove - चालवला.`driven - चालवलेला.
dry - वाळणे, वाळवणे.dried - वाळला, वाळवला.dried - वाळलेला, वाळवलेला.
eat - खाणे.ate - खाल्ला.eaten - खाल्लेला.
fall - पडणे.fell - पडला.fallen - पडलेला.
feed - खाऊ घालणे.fed - खाऊ घातले.fed - खाऊ घातलेला.
feel - वाटणे, जाणवणे.felt - वाटले, जाणवले.felt - वाटलेले, जाणवलेले.
fight - लढणे, झगडणे.fought - लढला, झगडला.fought - लढलेला, झगडलेला.
find - शोधणे, आढळणे.found - शोधले, आढळले.found - शोधलेला, आढळलेला.
flee - पळून जाणे.fled - पळून गेला.fled - पळून गेलेला.
fly - उडणे, उडवणे.flew - उडाला, उडवला.flown - उडालेला, उडवलेला.
forget - विसरणे.forgot - विसरला.forgotten - विसरलेला.
forgive - क्षमा करणे.forgave - क्षमा केली.forgiven - क्षमा केलेला.
freeze - गोठणे.froze - गोठला.frozen - गोठलेला.
get - मिळणे.got - मिळाला.got - मिळालेला.
give - देणे.gave - दिला.given - दिलेला.
go - जाणे.went - गेला.gone - गेलेला.
grind - दळणे.ground - दळले.ground - दळलेले.
grow - वाढणे, उगवणे.grew - वाढले, उगवले.grown - वाढलेले, उगवलेले.
hang - टांगणे, लोंबणे.hung - टांगले, लोंबले.hung - टांगलेले, लोंबलेले.
have - च्याजवळ, च्या मालकीचे असणे.had-च्याजवळ होते, च्या मालकीचे होते.had - च्याजवळ असलेले,
च्या मालकीचे असलेले
hear - ऐकणे.heard - ऐकला.heard - ऐकलेले
hide - लपणे, लपवणे.hid - लपला, लपवला.hidden - लपलेले, लपवलेले.
hit - तडाखा देणे.hit - तडाखा दिला.hit - तडाखा दिलेला.
hold - धरणे.held - धरले, धरून ठेवले.held - धरलेले, धरून ठेवलेले.
hurry - घाई करणे.hurried - घाई केली.hurried - घाई केलेले.
hurt - इजा करणे.hurt - इजा केली, दुखावले.hurt - इजा केलेला, दुखावलेला.
keep - ठेवणे, राखणे.kept - ठेवला, राखला.kept - ठेवलेला, राखलेला.
knit - विणणे.knit - विणला.knit - विणलेला.
know - माहीत असणे.knew - माहीत झाले / होते.known - माहीत असलेले.
lay - ठेवणे.laid - ठेवला.laid - ठेवलेला.
lead - नेतृत्व करणे.led - नेतृत्व केले.led - नेतृत्व केलेले.
leap - झेप / उडी घेणे.leapt, leaped - झेप / उडी घेतली.leapt, leaped - झेप / उडी घेतलेले.
learn - शिकणे.learnt, learned - शिकला.learnt, learned - शिकलेला.
leave - सोडणे, निघून जाणे.left - सोडणे, निघून गेला.left - सोडलेला, निघून गेलेला.
lend - उसने देणे.lent - उसने दिले.lent - उसने दिलेले.
let - होऊ / करू देणे.let - होऊ / करू दिले.let - होऊ / करू दिलेले.
llie - पडून राहणे.lay - पडून राहिला.lain - पडून राहिलेला.
lie - खोटे बोलणे.lied - खोटे बोलला.lied - खोटे बोललेला.
light - पेटवणे, प्रकाशित करणे.lit, lighted - पेटवले, प्रकाशित केले.lit, lighted - पेटवलेले, प्रकाशित केलेले.
make - तयार करणे.made - तयार केले.made - तयार केलेले.
marry - लग्न करणे / लावणे.married - लग्न केले / लावले.married - लग्न केलेला / झालेला.
meet - भेटणे.met - भेटला.met - भेटलेला.
pay - मूल्य / पैसे देणे.paid - मूल्य / पैसे दिले.paid - मूल्य / पैसे दिलेला.
pity - दया / कीव करणे.pitied - दया / कीव केली.pitied - दया / कीव केलेला.
put - ठेवणे.put - ठेवला.put - ठेवलेला.
read - वाचणे.read - वाचला.read - वाचलेला.
reply - उत्तर देणे.replied - उत्तर दिले.replied - उत्तर दिलेले.
rid - च्यापासून मुक्त करणे / होणे.rid - च्यापासून मुक्त केले / झाले.rid - मुक्त केलेले, झालेले.
ride - वाहन चालवणे, स्वार होणे.rode - वाहन चालवले, स्वार झाला.ridden - वाहन चालवलेले, स्वार झालेले.
ring - वाजणे, वाजवणे.rang - वाजली, वाजवली.rung - वाजलेली, वाजवलेली.
rise - झोपून उठणे, उगवणे.rose - झोपून उठला, उगवला.risen - उठलेला, उगवलेला.
run - धावणे.ran - धावला.run - धावलेला.
said - म्हणणे.said - म्हणाला.said - म्हणालेला.
see - पाहणे.saw - पाहिला.seen - पाहिलेला.
seek - शोधणे, मिळवणे.sought - शोधला, मिळवला.sought - शोधलेला, मिळवलेला.

No comments:

Post a Comment