New Update
आंतरजिल्हा बदली कार्यमुक्ती आदेश 2022 (2३) साठी खालील लिंक वर क्लीक करा.
DOWNLOAD
जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2022 कार्यमुक्त आदेश (दि. ०४-०५-२०२३) साठी खालील लिंक वर क्लीक करा.
DOWNLOAD
★ शाळा सुरु करणेबाबत पालक संमती पत्र
Download
1) शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक बदल
2) तंबाखूमुक्त शाळा घोषणा पत्र
३) स्वाध्यापुस्तिका
स्वाध्यायपुस्तिका इयत्ता १ली
स्वाध्यायपुस्तिका इयत्ता २ री
स्वाध्यायपुस्तिका इयत्ता ३ री
स्वाध्यायपुस्तिका इयत्ता ४ थी
स्वाध्यायपुस्तिका इयत्ता ५ वी
स्वाध्यायपुस्तिका इयत्ता ६ वी
स्वाध्यायपुस्तिका इयत्ता ७ वी
वाचन प्रेरणा दिन (१५ ऑक्टोबर )
आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली म्हणून १५ ऑक्टोबर हा दिवस राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. वाचन प्रेरणा दिनाचा प्रमुख उद्देश म्हणजेच मुले आणि पुस्तके यांच्यामध्ये एक घट्ट नाते निर्माण करणे, मुलांना वाचनामध्ये गोडी निर्माण व्हावी तसेच वाचनाची सवय लागावी जेणेकरून मुलांना वाचनाचे महत्व समजेल आणि त्यांचा व्यक्तिगत विकास होईल.
डॉ. कलाम यांचे लेखन विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार करण्याची दृष्टी, शक्तिशाली कृती करण्याची प्रेरणा आणि चेतना देण्याचे काम करत आहे, या दृष्टिकोनातूनच डॉ. कलाम यांच्या जन्मदिवसाचे अवचित साधून १५ ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुलांना मुक्तपणे वाचन करण्याचा आनंद मिळतो, कारण या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जास्तीत जास्त पुस्तके वाचण्यासाठी मुलांना प्रोत्साहित केले जाते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळांमध्ये वाचन कट्ट्याची निर्मिती झाली आहे तसेच शाळेतील पुस्तकपेढीतील पुस्तकांची संख्या देखील वाढली आहे.
इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, इंटरनेटचे मोहजाळे यामध्ये आजची पिढी कुठेतरी गुंतलेली दिसत आहे आणि त्यामुळे आपली वाचन संस्कृती कुठेतरी हरवत चालली आहे, याचाच विचार करून चला आपण आजपासूनच वाचनाची सवय लावून घेऊया आणि वाचन प्रेरणा दिन साजरा करूया.
https://zpshikshan.blogspot.com/
वरील लेख आवडल्यास किंवा या लेखामध्ये काही कमी असल्यास कमेंट करून कळवा.
No comments:
Post a Comment